Marathi News Photo gallery Easy and effective vastu remedies for prosperity vastu tips to get peaceful sleep every night know more about it
Vastu Tips : सावधान ! रात्री झोपताना या 5 गोष्टी जवळ घेताय ?, ताणतणावांना निमंत्रण देताय…
आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि संपत्तीवर होत असतो. झोपताना काही वस्तू सोबत ठेवल्याने व्यक्ती अनेक आर्थिक आणि मानसिक समस्यांमध्ये वाढ होतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.
1 / 5
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम देण्यात आले आहेत. घरातील गोष्टींचा परिणाम माणसांच्या आयुष्यावर होत असतो. त्याच प्रमाणे आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि संपत्तीवर होत असतो. झोपताना काही वस्तू सोबत ठेवल्याने व्यक्ती अनेक आर्थिक आणि मानसिक समस्यांमध्ये वाढ होतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.
2 / 5
पादत्राणे - वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल कधीही डोक्याजवळ किंवा पलंगाखाली ठेवू नयेत. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
3 / 5
अभ्यासाशी संबंधित गोष्टी - वास्तुशास्त्रानुसार अभ्यासाशी संबंधित कोणतीही वस्तू उशीखाली ठेवू नका. यामध्ये वर्तमानपत्र किंवा पुस्तक इत्यादींचा समावेश आहे. यामुळे विद्याचा अपमान होतो आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाता. त्याच प्रमाणे तुमच्या कार्यात विघ्नांमध्ये वाढ होते. त्यामुळे या गोष्टी उशा खाली घेणा टाळाच.
4 / 5
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स - झोपताना मोबाईल फोन इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कधीही ठेवू नयेत. यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो, ज्याचा तुमच्या झोपेवरही वाईट परिणाम होतो. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समधून निघणारी क्ष- किरणे आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करतात.
5 / 5
पर्स किंवा वॉलेट - झोपताना कधीही पर्स किंवा पाकीट सोबत ठेवू नका. असे केल्याने व्यक्तीला सतत पैशाची चिंता असते. त्यामुळे मानसिक तणावही निर्माण होतो. झोपताना तुम्ही पैसे कपाटात किंवा इतर कोणत्याही सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता. त्यांचा प्रमाणे असे केल्यास पैशाची वाढ होत नाही अशी मान्यता आहे. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)