फुटाणे खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. फुटाण्यामध्ये फायबर आणि प्रथिने असतात. हे कॅलरीचे प्रमाण देखील कमी करते. हे खायला खूप चवदार स्नॅक आहे.
काजू, मनुका, अक्रोड, अंजीर आणि बदाम यासारखा सुकामेवा तुम्ही खाऊ शकता. हे आपले चयापचय मजबूत करतात. सुकामेवा खाल्ल्यानंतर आपले पोट बऱ्याच वेळ भरल्यासारखे वाटते.
पॉपकॉर्नमध्ये फायबर आणि प्रथिने असतात. त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे. हा एक उत्तम स्नॅक आहे.
गाजर, शिमला मिरची, टोमॅटो आणि काकडी तुम्ही कच्ची दुपारच्या वेळी खाऊ शकतो. त्यात फायबरसह इतरही अनेक पोषक घटक आहेत.
चिक्की हा एक हेल्दी स्नॅक आहे. ओट, शेंगदाणे, गुळ, मनुका, वेलची, साखर आणि बटरपासून तयार केले जाते. यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात.