आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत.
आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.
आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.
आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते. व्हिटामिन बी6’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो.
आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.