Marathi News Photo gallery Eknath shinde journey as chief minister will be shown in dharmaveer 2 prasad oak pravin tarde
‘धर्मवीर 2’मध्ये दाखवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रवास?
'धर्मवीर' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा मुहूर्त संपन्न झाला. येत्या 9 डिसेंबरपासून शूटिंगला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाविषयी एकनाथ शिंदे काय म्हणाले, ते जाणून घेऊयात..
'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. 'धर्मवीर' या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही महिन्यांपूर्वी 'धर्मवीर 2' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.
1 / 6
नुकताच 'धर्मवीर 2' या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ तसंच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. येत्या 9 डिसेंबरपासून ठाणे इथं या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
2 / 6
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विट्ठल यांच्यावर असून अभिनेता प्रसाद ओक दिघे साहेबांची भूमिका साकारणार आहे. तर अन्य कलाकारांची नावे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. 'धर्मवीर 2' या चित्रपटाच्या पोस्टरवर "साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...." अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे.
3 / 6
“काहींना धर्मवीर हा सिनेमा खटकला, काही लोकं सिनेमा बघता बघता उठून गेले, काही लोकांना काही सीन्स आवडले नाहीत. पण आता कोणाला आवडो न आवडो, आता आपण फुल फायनल आहोत. तेव्हा काही गोष्टी इच्छेविरोधात कराव्या लागल्या होत्या. त्या गोष्टी प्रवीण तरडेंनाही आवडल्या नव्हत्या,” असा उपरोधिक टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.
4 / 6
हा चित्रपट हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे. "पहिल्या भागात मी नगरविकास मंत्री होतो आणि आता दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री झालेलो आहे.” असंही शिंदे यांनी सांगितलं.
5 / 6
प्रसाद ओकशिवाय या चित्रपटात इतर कोणते कलाकार असणार आहेत हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र 'धर्मवीर 2' या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चित्रपटातून उलगडली जाणार म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार असल्याचं निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितलं.