इंग्लंडचा संघ टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतात पोहोचला आहे. भारतातल्या आगमनाचा व्हिडिओ इंग्लंड टीमच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.
ज्यामध्ये संघाचे सर्व खेळाडू चेन्नईतील हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रुटसह उर्वरित संघ थेट श्रीलंकेमधून भारतात दाखल झाले आहेत.
इंग्लंडच्या संघाने श्रीलंका दौऱ्यावर शानदार प्रदर्शन केले आहे. श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामने जिंकण्यात इंग्लंडच्या संघाला यश आले.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात तर इंग्लंडने श्रीलंकेविरोधात त्यांच्याच भूमित कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. यामुळे इंग्लंड आणि टीम इंडियाचा विश्वास दुणावला आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.