ईशा देओल ते सानिया मिर्झा.. 2024 या वर्षात सेलिब्रिटींच्या घटस्फोटांची मालिकाच

अभिनेत्री ईशा देओलने पती भरत तख्तानीला घटस्फोट दिल्याचं जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. 2024 या वर्षांत आतापर्यंत इतरही काही सेलिब्रिटींनी पतीपासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचाही समावेश आहे.

| Updated on: Feb 08, 2024 | 9:06 AM
सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य हे त्यांच्या सिनेमा किंवा शोजप्रमाणेच 'पिक्चर परफेक्ट' असतं, असं चाहत्यांना वाटतं. म्हणूनच जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्यात समस्या निर्माण होतात, तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटींच्या घटस्फोटाचं वृत्त सतत ऐकायला मिळतंय. बऱ्याच वर्षांच्या संसारानंतर या सेलिब्रिटींनी जोडीदारापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 2024 या वर्षांत कोणकोणत्या सेलिब्रिटींनी घटस्फोट जाहीर केला, ते पाहुयात..

1 / 5
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओलने 19 जून 2012 रोजी बिझनेसमन आणि बालपणीचा मित्र भरत तख्तानीशी लग्न केलं. आता लग्नाच्या 12 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त झाल्याचं जाहीर केलंय. या दोघांना दोन मुली आहेत. परस्पर संमतीने हा घटस्फोट घेतल्याचं ईशा आणि भरतने स्पष्ट केलंय.

2 / 5
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या विभक्त होण्याची चर्चा होती. अखेर शोएब मलिकने त्याच्या दुसऱ्या निकाहचा फोटो पोस्ट करत सर्वांनाच धक्का दिला. सानियाने शोएबला एकतर्फी घटस्फोट (इस्लाममध्ये खुला) दिल्याचं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं. 13 वर्षांच्या संसारानंतर सानिया-शोएब विभक्त झाले.

3 / 5
2024 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी एका सेलिब्रिटी जोडप्याने घटस्फोट जाहीर केला. 'बॅकस्ट्रीट बॉईज' या प्रसिद्ध म्युझिक बँडचा एजे मॅकलीन आणि त्याची पत्नी रोचेल डीअॅना मॅकलीन यांनी विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. 11 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

4 / 5
'भाभीजी घर पर है' या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी अत्रेनंही पतीपासून विभक्त झाल्याचं सांगितलं. शुभांगी आणि तिचा पती पियुष पुरे हे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. मुलीखातर ते घटस्फोटासाठी अर्ज करत नसल्याचं कळतंय. मात्र 19 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.