इटलीची कंपनी लज्जारिनी डिजाइन स्टूडियो (Lazzarini Design Studio) ने 88 फूट लांब 'हाइपर याट'बद्दल माहिती समोर आणली आहे. याला ‘फेरारी ऑफ द सी’ (Ferrari of the seas) चे नाव देण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही 'हाइपर याट' अनेक गोष्टींसाठी खास आहे. यामध्ये सुपर कारला पार्क करण्यासाठी गॅरेज देखील देण्यात आले आहे. 75 कोटी रुपयांच्या या हाइपर याट (hyperyacht) मध्ये काय काय आहे विशेष.. चला तर मग जाणून घेऊया...
याच्यात असणाऱ्या सोई सुख सुविधा या 'हायपर याट' च्या महागडे असण्यामागचे कारण आहे. यात 4 बेडरूम शिवाय किचन आणि क्रू साठी केबिन सुद्धा देण्यात आले आहे. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार , याटच्या मागील भागात कार ठेवण्यासाठी गॅरेज देखील आहे. प्रवाशांना यामध्ये बसण्यासाठी मधल्या भागातून प्रवेश मार्ग देण्यात आला आहे, ज्याचा एक भाग याटच्या वरच्या भागात तर एक याटच्या खालील भागात उघडतो.
याटच्या लोअर केबिनमध्ये लिविंग रूम आहे. यासोबतच किचन सुद्धा अटॅच करण्यात आलेले आहे. यामध्ये देण्यात आलेल्या बेडरूममध्ये 3 ते 4 व्यक्ती राहू शकतात. याटच्या 2क्रू मेंबर्ससाठी सुध्दा एका बेडरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व याटच्या मूळ डिझाईनचा एक भाग आहेत. एखाद्याने याची खरेदी केल्यानंतर जर त्याच्या मालकाला याच्या डिझाईनमध्ये काही बदल करायचे असतील तर ते बदल करणे त्याला सहज शक्य होणार आहे.
याटच्या वरच्या भागात लिविंग एरिया तयार करण्यात आला आहे. कॅप्टनचे केबिन सुद्धा या भागात आहे. रिपोर्ट नुसार, या याटला तयार करताना अनेक गोष्टींबद्दल विशेष ध्यान देण्यात आले आहे. जसे की समुद्राच्या लाटांवर शानदार प्रवासाचा अनुभव देण्यासोबतच लक्झरी सुविधा याच्या प्रर्थमिकतेत समाविष्ट आहेत.
हा याट वेगाच्या बाबतीत सुद्धा हे खूप वेगवान आहे. हि सुपर याट 370किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने चालते. तसेच ही याट 6600ब्रेक- हॉर्सपावरच्या इंजिनची शक्ती यात आहे. याचे वजन 22 टन आहे, याचे डिझाईन तयार करण्यात आलेल्या कंपनीचे म्हणणे आहे की, हि याट अधिक वेगात सुद्धा प्रवाशांना अधिक सुलभ प्रवास करण्याची हमी देते.