कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता, आता हळूहळू देश पूर्वपदावर येत आहे. यादरम्यान जिमसुद्धा बंद होत्या. आता अनलॉकदरम्यान सर्व जिम सुरू करण्यास परवानगी मिळालेली आहे.
फिटनेसवर विषेश लक्ष देणाऱ्या कलाकारांनी आता जिममध्ये जाण्यास सुरुवात केली आहे.
फिटनेस फ्रिक सोफी चौधरीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं सात महिन्यांनंतर जिममध्ये गेल्याचं सांगितलं आहे.
अभिनेत्री सोफीनं कोरोनाचा जिमवर काय परिणाम झाला, जिममध्ये काय बदल झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या व्हिडीओमध्ये सरकारनं दिलेले सगळे नियम पाळत असल्याचं दिसत आहे.
परफेक्ट फिगरसाठी सोफी व्यायाम, योग आणि डाएटवर विषेश लक्ष केंद्रीत करते.