गोंदिया : जिल्हातील आमगाव तालुक्यातील नवेगाव येथे विजेची तार अंगावर पडल्यामुळे पाच जनावरे दगावली.
विजेची तार थेट अंगावर पडल्यामुळे पाचही जनावरे जागेवरच ठार झाली. यामध्ये गायी तसेच म्हशींचा समावेश आहे.
नंदलाल धनलाल बिसेन आणि संतोष उरकुडा पटले या शेतकऱ्यांची ही जनावरे आहेत.
पाच जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. तर दुसरीकडे महावितरणचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला.
या प्रकरणात तक्रार आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.