कोल्हापुरात पूर ओसरल्यानंतर आता पुराची भीषणता दाखवणारी दृश्य, अनेक प्रमुख मार्ग अद्यापही पाण्याखालीच
kolhapur flood update: गेल्या 48 तासांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात देखील पावसाने उघडीत दिली आहे. तसेच धरणातून सोडण्यात आलेले पाणी थांबवले आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू घट होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत असल्याने तीन ते चार दिवसांपासून पाण्याखाली केलेल्या महत्त्वाच्या मार्गावरील पाणी आता उतरू लागले आहे. परंतु दुसरीकडे कोल्हापुरातील पूर ओसरल्यानंतर आता पुराची भीषणता दाखवणारी दृश्य समोर येत आहेत.
Most Read Stories