Nashik| नाजुक देशा, कोमल देशा…5 लाख फुले, दीड लाख कुंड्या आणि तब्बल 9 एकरांवर साकारलंय देशातलं पहिलं फ्लॉवर पार्क!
देशातलं पहिलं फ्लॉवर पार्क नाशिकमध्ये साकारलंय. खरं तर नाशिकचं 1200 ते 1300 च्या दशकातील नाव म्हणजे गुलशनाबाद. कधीकाळी सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांनी झाकलेलं शहर म्हणून नाशिक प्रसिद्ध होतं. मात्र, काळाच्या ओघात शहरीकरण वाढलं आणि नाशिकची ही ओळख नाहीशी झाली. मात्र, फॉरेनच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या फ्लॉवर पार्कमुळे नाशिकला पुन्हा एकदा गुलशनाबादचं पुनर्वैभव मिळेल असं चित्र आहे. देशभरातल्या पर्यटकांसाठी खुणावणाऱ्या या फ्लॉवर पार्कची ही काही क्षणचित्रं.
Most Read Stories