उन्हाळ्यात थकलेल्या आणि निर्जीव त्वचेसाठी फेस मास्क वापरणे आवश्यक असते. यासाठी एक चमचा एलोवेरा जेल, एक चमचा गुलाब पाणी आणि एक चिमूटभर हळद मिक्स करू पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
आपला चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा तरी चेहरा धुतला पाहिजे. आठवड्यातून किमान दोनदा स्क्रब करा आणि फेस स्टीम घ्या. सकाळी आणि रात्री त्वचेत हायड्रेट होण्यासाठी बदाम तेल, नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने हलक्या हाताने मसाज करा.
उन्हाळ्यात सनस्क्रीन क्रीम वापरा. हे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपले संरक्षण करण्यास मदत करते.
उन्हाळ्यात आपण हायड्रेटेड त्वचेसाठी हायड्रेटिंग टोनर वापरू शकता. यासाठी आपण ग्रीन टी आणि तेल एकत्र मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. याशिवाय तुम्ही गुलाबाचे पाणी देखील वापरू शकता.
उन्हाळ्यात त्वचेसाठी मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे.मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेतील ओलावा टिकवून राहतो.