Hair Growth साठी उत्तम असणारे हे 5 पदार्थ!
केसांसाठी काही पदार्थ उत्तम असतात. हे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करून घ्या. केस पातळ असतील आणि मजबूत केस हवे असतील तर तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. कोणते आहेत हे पदार्थ जाणून घेऊया.
1 / 5
रताळे आवडतात का? रताळ्यात बीटा-कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते. यात व्हिटॅमिन ए सुद्धा असतं. रताळे केसांच्या मजबुतीसाठी उत्तम! आजच याचा आहारात समावेश करा.
2 / 5
अंडी अनेक गोष्टींमुळे आरोग्यासाठी चांगले असतात. प्रथिने, बायोटिन आणि झिंक आणि सेलेनियम युक्त अंडी केसांना प्रचंड फायदेशीर ठरतात. केस पातळ होत असतील तर अंडी हा उत्तम उपाय आहे.
3 / 5
बदाम, अक्रोड आणि फ्लॅक्ससीड्स केसांसाठी उत्तम आहेत. यात बायोटिन, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिड असतात. बदाम अक्रोड नियमित खाल्ल्याने केसांना खूप फायदा होतो. यात जीवनसत्त्वे असतात.
4 / 5
दह्याचे अनेक प्रकार असतात, ग्रीक दही त्यातलाच एक. या दह्यात प्रथिने, व्हिटॅमिन बी 5 आणि व्हिटॅमिन डी असतं. हे पोषक घटक केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
5 / 5
Vitamin E, Vitamin C हे व्हिटॅमिन केसांच्या वाढीसाठी उत्तम असतात. ॲवोकॅडो मध्ये निरोगी चरबी आणि Vitamin E, Vitamin C असतात. केसांच्या वाढीसाठी हे फळ खूप चांगलं आहे. याचा आहारात नक्की समावेश करा.