
केळी थंड तापमानात ठेवल्यास रेफ्रिजरेशनमुळे ती काळवंडते. केळी ही नैसर्गिकरित्या पिकून द्यायला हवी. थंड वातावरण असल्यास यात व्यत्यय येतो. केळी काळी पडते आणि चवीला खराब लागते त्यामुळे चुकूनही केळी फ्रिज मध्ये ठेवू नये.

लसूण थंड वातावरणात राहू शकत नाही. फ्रिज मध्ये स्टोअर करून ठेवल्यावर लसणाला बुरशी लागू शकते. लसूण खराब होतो. त्यामुळे लसूण फ्रिज मध्ये ठेवू नये.

कांद्यामध्ये आधीपासूनच ओलावा आणि नैसर्गिक तेल असते त्यामुळेच कांद्याची चव आणि त्याचा पोत असा असतो. फ्रिज मध्ये ठेवल्यावर कांदा खराब होतो शिवाय त्याचा वास देखील इतर पदार्थांना लागतो.

टोमॅटो थंडीमुळे चिकट होतात, पिचकतात. टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू नये तुलनेने ते लवकर खराब होतात. बाहेर ठेवल्यास टोमॅटो चांगले राहतात.

मधात पाण्याचे प्रमाण कमी आणि आम्लता जास्त असते. या गुणधर्मांमुळे मधात बॅक्टेरिया नसतात. फ्रिज मध्ये ठेवल्यास याच्या अगदी उलट होते त्यामुळे चुकूनही मध फ्रिजमध्ये ठेवू नये.

बटाटे स्टार्चयुक्त भाज्या आहेत ज्या कोरड्या वातावरणात वाढतात. रेफ्रिजरेशनमुळे स्टार्चचे शर्करामध्ये रूपांतर वेगाने होते ज्यामुळे बटाटे चवीला गोड होतात. तुम्हाला गोड बटाटे खायला आवडतील का? नाही ना? मग फ्रिज मध्ये ठेवू नका.

कॉफी हायग्रोस्कोपिक आहे, याचा अर्थ ती आपल्या सभोवतालच्या वातावरणातील ओलावा आणि गंध शोषून घेते. फ्रीजमध्ये कॉफी सभोवताली जे काय असेल त्याची चव आणि त्याचा गंध शोषून घेऊ शकते.