मुंबई महानगरपालिका आणि उर्दू शिकवणाऱ्या शिक्षकांच्या संघटनेकडून मुंबईच्या इमामवाडा परिसरात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोन लायब्ररी सुरु करण्यात आली आहे.
आर्थिक दुर्बलतेमुळे स्मार्टफोन घेणे परवडत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोबाईल लायब्ररी फायदेशीर ठरत आहे.
आमच्याकडे येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन्स नाहीत किंवा त्यांच्या कुटुंबात केवळ एकच मोबाईल फोन आहे. अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आम्ही ही लायब्ररी सुरु केली.
सध्या या मोबाईल लायब्ररीमध्ये 22 विद्यार्थी शिकायला येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लायब्ररीत संपूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले.
या लायब्ररीत गरीब विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाचे ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतील. सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत ही लायब्ररी सुरु असल्याची माहिती लायब्ररीच्या प्रमुख शाहिना सय्यद यांनी दिली.