धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं शिकतात. नुकताच या शाळेचा वार्षिक समारंभ पार पडला. यावेळी आपल्या मुलांचा खास परफॉर्मन्स पाहण्यासाठी हे सेलिब्रिटी उपस्थित होते.
शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांची मुलगी आराध्या बच्चनने जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला. आराध्याने प्रेक्षकांसमोर एक नाटक सादर केलं आणि त्यातील तिचं अभिनय पाहून नेटकरीही भारावले.
शाहरुख खानचा मुलगा अबरामसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाला होता. दहा वर्षीय अबरामने स्टेजवर अभिनय करून दाखवलं. इतकंच नव्हे तर त्याने वडिलांची आयकॉनिक पोझसुद्धा करून दाखवली. ते पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेल्या शाहरुख, गौरी आणि सुहानाला हसू अनावर झालं होतं.
करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरसुद्धा याच शाळेत शिकतो. तैमुरनेही यावेळी पारंपरिक वेशभूषा केली होती. त्याला स्टेजवर परफॉर्म करताना पाहून करीनाच्या चेहऱ्यावर स्पष्ट आनंद झळकत होता. मुलाच्या परफॉर्मन्स करीना तिच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करताना दिसून आली.
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची दोन्ही मुलं अंबानींच्या शाळेत शिकत आहेत. यावेळी मिशाने नऊवारी साडी नेसली होती. आपल्या दोन्ही मुलांचा खास परफॉर्मन्स पाहण्यासाठी शाहिद आणि मीरा दोघं कार्यक्रमाला उपस्थित होते.