Marathi News Photo gallery From Pratik Sehajpal To Rakhi Sawant bigg boss Contestants Who Walked Off From Grand Finale With Bag Full Of Money
‘बिग बॉस’ची ट्रॉफी नाही पण पैशांनी भरलेली बॅग मिळाली; कोणाकोणाचं फळफळलं नशीब?
बिग बॉसच्या टॉप 5 स्पर्धकांना एक ऑफर दिली जाते. या ऑफरअंतर्गत कोणत्याही एका स्पर्धकाला पैशांची बॅग स्वीकारून ग्रँड फिनालेमधून बाहेर पडावं लागतं. बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनपासून याची सुरुवात झाली होती. आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धकांनी ही ऑफर स्वीकारली, ते पाहुयात..
1 / 10
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या आधी टॉप 5 स्पर्धकांना एक ऑफर दिली जाते. त्यांच्यासमोर पैशांनी भरलेली बॅग ठेवली जाते आणि ती उचलून कोणता स्पर्धक फिनालेतून बाहेर पडतो, हे पाहणं फार औत्सुक्याचं असतं. गेल्या 16 सिझनमध्ये अनेकदा स्पर्धकांना अशी ऑफर देण्यात आली होती. आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धकांनी ती बॅग स्वीकारून फिनालेमधून काढता पाय घेतला, ते पाहुयात..
2 / 10
प्रतिक सेहजपाल- 'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या सिझनमध्ये टॉप 5 स्पर्धकांना पैसे तर नाही पण बिग बॉसच्या पंधराव्या सिझनमध्ये थेट एण्ट्री तिकिट ऑफर करण्यात आली होती. तेव्हा प्रतिकने हे तिकिट स्वीकारलं होतं.
3 / 10
निशांत भट्ट- डान्सर निशांत भट्टने बिग बॉसच्या पंधराव्या सिझनमध्ये 10 लाख रुपयांची बॅग घेऊन घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश या सिझनची विजेती ठरली होती. तिला 40 लाख रुपये मिळाले होते.
4 / 10
राखी सावंत- बिग बॉसच्या चौदाव्या सिझनमध्ये रुबिना दिलैक, राहुल वैद्य, निक्की तांबोळी आणि राखी सावंत यांच्यापैकी राखीने पैशांची उचलली होती. त्या बॅगमध्ये 14 लाख रुपये होते. तर रुबिना या सिझनची विजेती ठरली होती. तिला बक्षीस म्हणून 36 लाख रुपये मिळाले होते.
5 / 10
पारस छाब्रा- 'बिग बॉस 13'मध्ये अभिनेता पारस छाब्राने 10 लाख रुपयांनी भरलेली पैशांची बॅग उचलली होती. या सिझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज आणि शहनाज गिल हे अंतिम फेरीत पोहोचले होते. तर विजेत्या सिद्धार्थ शुक्लाला 30 लाख रुपये मिळाले होते.
6 / 10
दीपक ठाकूर- 'बिग बॉस 12'मध्ये दीपक ठाकूरने तब्बल 20 लाख रुपयांची बॅग स्वीकारली होती. या सिझनची विजेती अभिनेत्री दीपिका कक्कर ठरली होती. तर दीपिका आणि दीपकसोबत माजी क्रिकेटर श्रीसंत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.
7 / 10
मनु पंजाबी- बिग बॉसच्या दहाव्या सिझनमध्ये मनु पंजाबीने 10 लाख रुपयांची बॅग घेतली होती. या सिझनमध्ये मनवीर गुर्जर विजेता ठरला होता. त्याला बक्षीस म्हणून 40 लाख रुपये मिळाले होते.
8 / 10
किश्वर मर्चंट- 'बिग बॉस 9'मध्ये अभिनेत्री किश्वर मर्चंटने 15 लाख रुपयांची बॅग स्वीकारून फिनालेमधून माघार घेतली होती. तर प्रिन्स नरुला या सिझनचा विजेता ठरला होता. त्याला 35 लाख रुपये मिळाले होते.
9 / 10
प्रितम सिंह आरजे- 'बिग बॉस 8' किंवा 'बिग बॉस हल्लाबोल'च्या सिझनमध्ये प्रितम सिंह आरजे याने तब्बल 25 लाख रुपयांची ब्रीफकेस उचलली होती. गौतम गुलाटी या सिझनचा विजेता ठरला होता. त्याला 50 लाख रुपये मिळाले होते.
10 / 10
बख्तियार इराणी- बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनमध्ये अभिनेता बख्तियार इराणीने 10 लाख रुपये स्वीकारले होते. या सिझनचा विजेता विंदू दारा सिंग ठरला होता. त्याला तब्बल 1 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले होते.