गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या अफेअर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्या दोघांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच आपल्या स्टाईल आणि अनोख्या अंदाजाने लोकांची मने जिंकताना दिसते. ती नेहमीच फिटनेसला अधिक महत्त्व देताना दिसते, त्याचबरोबर बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते.