Photo Gallery | कुलगुरू हातात झाडू घेतात तेव्हा…!
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात ग्रीन कॅम्पस उपक्रमाला सुरुवात करण्यात आलीय. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व लक्षात घेता विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून व कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी श्रमदान करून विद्यापीठ परिसर हरित व सुंदर करत आहेत. कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनीही स्वतः हातात झाडू घेत या उपक्रमात सहभाग घेतला.
Most Read Stories