हृतिक रोशनचं नाव घेतलं की सर्वात पहिलं डोक्यात येतं ती हृतिक रोशनची जबरदस्त बॉडी, प्रत्येक तरुणाची त्याच्यासारखी बॉडी बनवी हे स्वप्न असतं. त्याची जबरदस्त पर्सनॅलिटी आणि मग त्याचे अभिनयातील करिअर आठवते. भारताच्या या पहिल्या सुपरहिरोचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हृतिक रोशनचे चाहते फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभारात आहेत. त्याला जागतिक सुपरस्टार मानले जाते. हृतिक रोशनच्या लूकची नेहमीच चर्चा असते असते, असं बोललं जातं इतर अभिनेत्यांना श्रीमंत दिसण्यासाठी जास्त मेकप आणि मेहनत लागते, मात्र हृतिक रोशनला गरिब दिसण्यासाठी, सुमार पर्सनॅलिटी बनवण्यासाठी जास्त मेहनत लागते.
सुरवातील आपले वडिल राकेश रोशन यांचे बोट धरून कहो ना प्यार है चित्रपटातून मोठ्या पडद्यावर उतरलेला हृतिक रोशन काही दिवसातच चाहत्यांच्या मनावर राज्य करू लागला.
सुपर थर्टी, काबील अशा अनेक चित्रपटातून हृतिकने आपल्या अस्सल अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या सुपर थर्टी चित्रपटाचं तर जगभर कौतुक झाले.
मोठ्या पडद्यावर हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय ही जोडीही जोरदार गाजली, धूम चित्रपटाची आजही चर्चा होते, कधी हृतिक रोशन काँट्रोव्हर्सीतही सापडताना दिसून आला, कंगना आणि हृतिक रोशनचा वाद कित्येक वर्षे गाजत राहिला.
क्रिश चित्रपटाच्या माध्यमातून भारताला पहिला सुपरहिरो मिळाला, हृतिक रोशनच्या क्रिश चित्रपटाने त्याला फक्त तरुण, तरुणींच्याच नाही, तर लहानग्यांच्या मनापर्यंत पोहोचवले, भारताच्या या पहिल्या सुपरहिरोला वाढदिवसाच्या शुभेच्छा.