राजेशाही थाटात करा प्रवास, बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक मिनीव्हॅन

Electric Minivan | स्वीडनची प्रमुख वाहन निर्माता कंपनी व्होल्वो जगभरात सुरक्षित आणि आलिशान वाहन तयार करणारी म्हणून ओळखली जाते. या कंपनीने प्रवाशांसाठी एक खास आलिशान मिनीव्हॅन बाजारात आणली आहे. त्यामुळे मित्रमंडळी,कुटुंबियांसोबत तुम्हाला दूरची सफर अनुभवता येईल. अशी खास आहे ही इलेक्ट्रिक मिनीव्हॅन

राजेशाही थाटात करा प्रवास, बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक मिनीव्हॅन
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 10:45 AM

स्वीडनच्या व्होल्वो या कंपनीने Volvo EM 90 ही खास इलेक्ट्रिक मिनीव्हॅन आणली आहे. ती रस्त्यावरुन धावणाऱ्या एखाद्या लिव्हिंग रुम सारखी असल्याचा फील येईल. यामध्ये एकापेक्षा एक आलिशान फीचर्स आणि नव तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून लक्झरी मल्टी पर्पज व्हेईकल्स सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल समोर आले आहेत. त्यात टोयोटा वेलफायर, किआ कार्निवाल यासह व्होल्वोची पण भर पडली आहे. Volvo EM 90 ही व्होल्वोची कंपनी Geely च्या आलिशान मिनीव्हॅन Zeekr 009 वर आधारीत आहे.

Volvo EM 90 मध्ये कंपनीने स्लाईडिंग डोर्ससह एक मोटा ग्लास रुफ दिला आहे. त्यामुळे केबिनला एक प्रीमियम फील येतो. या मिनीव्हॅनच्या फ्रंटला हॅमर स्टाईल एलईडी लाईटिंग देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

कारच्या मागील बाजूस खास डिझाईन करण्यात आले आहे. टेल लाईट्सला एकदम क्लासिक लूक देण्यात आला आहे. तर रिअर लूक एकदम साधा ठेवण्यात आला आहे. Volvo EM 90 मध्ये कंपनीने 116kWh क्षमतेची दमदार बॅटरी पॅक दिला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक मिनीव्हॅन 738 किमीची रेंज देईल.

या कारमध्ये एकूण तीन रो आहेत. या तीन रांगेत समोरच्या आणि मध्यल्या रांगेसाठी आलिशान कॅप्टन सीटची व्यवस्था करण्यात आली आहे. तर तिसऱ्या रांगेसह एकूण 6 व्यक्तींच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

व्होल्वोच्या दाव्यानुसार, इन्फोटेनमेंट सिस्टम डिस्प्लेमध्ये सध्या बाजारात उपलब्ध इतर मॉडेलच्या तुलनेत अधिक फीचर्स देण्यात आले आहेत. इतर मॉडेलपेक्षा यामध्ये अपडेटेड ग्राफिक्स देण्यात आले आहे. याच्या इंटिरिअरमध्ये 15.4 इंचची टचस्क्रीन आणि एक डिजिटल गेज क्लस्टर देण्यात आले आहे.

या इलेक्ट्रिक व्हॅनमध्ये एक सिंगल इलेक्ट्रिक मोटर आहे. जी 268hp ची सर्वोत्तम ऊर्जा निर्मिती करते. ही मिनीव्हॅन केवळ 8.3 सेंकदात 0 ते 100 किमीचा प्रतितास वेग पकडू शकते.

Non Stop LIVE Update
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.