तब्बल 700 कारागिरांच्या टीमने तीन एकरमध्ये असा उभारला ‘हिरामंडी’चा भव्यदिव्य सेट

संजय लीला भन्साळी हे सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्याच्या चित्रपटातील प्रत्येक दृश्यात कलेचा उत्कृष्ट नमुना पहायला मिळतो. त्यामुळे ‘हिरामंडी’कडूनही प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

| Updated on: Apr 23, 2024 | 12:41 PM
चित्रपटांद्वारे 'लार्जर दॅन लाइफ'चा अनुभव देणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी लवकरच 'हिरामंडी' या सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'हिरामंडी'च्या ट्रेलरमध्ये भव्यदिव्य सेट्स, कलाकारांचे भरजरी कपडे, अत्यंत बारकाइने डिझाइन केलेली प्रत्येक गोष्ट पहायला मिळते.

1 / 7
"मला भव्यदिव्य जागेत हरवून जायला आवडतं" असं म्हणत भन्साळींनी त्यांच्या चित्रपटांमधील मोठ्या सेट्समागील कारण सांगितलं. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'हिरामंडी' या आठ भागांच्या सीरिजसाठी त्यांनी तीन एकर जमिनीवर सेट उभारला होता.

2 / 7
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भन्साळींनी सेटसाठी किती मेहनत घेतली, याविषयी सांगितलं. जवळपास 60 हजार लाकडी फळ्या आणि धातूच्या फ्रेम्सने सेट उभारण्यासाठी 700 कारागिरांच्या टीमने मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सात महिने काम केलं होतं.

3 / 7
ख्वाबगाह, भव्य मशीद, मोठं अंगण, नृत्यासाठीचा हॉल, पाण्याचे कारंजे, वसाहतीसारखी वाटणाऱ्या रुम्स, रस्ते, दुकानं, इतर लहान कोठे, हमाम खोली या सर्व गोष्टी सेटवर उभारण्यात आल्या आहेत.

4 / 7
"उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, पण उत्कृष्टता कधीही साध्य केली जाऊ शकत नाही", असं भन्साळी म्हणतात. मुघल लघुचित्रे, भित्तीचित्रे, ब्रिटिश अधिकाऱ्यांची चित्रे, खिडकीच्या चौकटींवरील फिलीग्रीचे काम, फरशीवरील मुलामा चढवलेले नक्षीकाम, बारीक नक्षीकाम केलेले लाकडी दरवाजे, झुंबर हे सर्व भन्साळींच्या देखरेखीखाली हाताने बनवण्यात आले आहेत.

5 / 7
"तुम्ही फक्त एखादा सेट बनवून त्यात तुमची पात्रं उभी करू शकत नाही. अशा पद्धतीने काम होत नाही. फ्रेम मेकिंग आणि फिल्म मेकिंगमध्ये आर्किटेक्चर खूप महत्त्वाची भूमिका बजावते", असं भन्साळी म्हणाले.

6 / 7
संजय लीला भन्साळी यांच्या मनात गेल्या 18 वर्षांपासून 'हिरामंडी'ची संकल्पना होती. या वेब सीरिजमध्ये मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजिदा शेख, शर्मिन सेगल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

7 / 7
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.