‘या’ बँकांमध्ये बचत खात्यावर मिळतेय सर्वाधिक व्याज
Bank Interest Rate | अनेक बँकांनी बचत खाते आणि मुदत ठेवीवरील व्याजदरात लक्षणीय कपात केली आहे. त्यामुळे आता ग्राहक चांगले व्याज देणाऱ्या बँकांच्या शोधात आहेत.
बचत खात्यावर सर्वाधिक व्याज
Follow us
कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. याचा परिणाम बँकांवरही झाला आहे. अनेक बँकांनी बचत खाते आणि मुदत ठेवीवरील व्याजदरात लक्षणीय कपात केली आहे. त्यामुळे आता ग्राहक चांगले व्याज देणाऱ्या बँकांच्या शोधात आहेत.
इंडसइंड बँकेत तुम्हाला बचत खात्यावर पाच टक्के व्याज दिले जात आहे. या बँकेत मिनिमम बॅलेन्स 1500 ते 10 हजार रुपये इतका आहे.
येस बँकेकडून बचत खात्यावर 5.25 टक्के व्याज दिले जात आहे. या बँकेत मिनिमम बॅलेन्सची मर्यादा 10 हजार ते 25 हजार रुपये इतकी आहे.
बंधन बँकेत बचत खात्यावर सहा टक्के व्याज मिळत आहे. या बँकेतील अकाऊंटसाठी मिनिमम बॅलेन्सची मर्यादा 5000 रुपये इतकी आहे.
आरबीएल बँकेत बचत खात्यावर 6.25 टक्के इतके व्याज मिळते. या बँकेत मिनिमम बॅलेन्सची मर्यादा अडीच हजार ते पाच हजार रुपये इतकी आहे.
डीसीबी बँकेत बचत खात्यावर 6.75 टक्के इतके व्याज दिले जाते. या बँकेत मिनिमम बॅलेन्सची मर्यादा अडीच हजार ते पाच हजार रुपये इतकी आहे.