Home Remedies For Acidity : हल्लीच्या बदलत्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे (Lifestyle) लोकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या येता. अॅसिडिटी (Acidity) अशीच एक समस्या आहे. अॅसिडिटीमुळे पित्त तयार होतं. त्यामुळे पोटात उष्णता वाढते.
तेव्हा जास्त मिरची, मसाले किंवा खवखवा अशा गरम गरम पदार्थ खाल्ले तर पोटात आम्ल तयार होण्यास सुरवात होते. छातीत आणि घशात जळजळ होते, कोरडे खोकला, अपचन, उलट्या असे त्रासही होतात. पण आज आम्ही तुम्हाला यापूस मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपचार (Home Remedies) सांगणार आहोत.
- अॅसिडिटीमुळे त्रस्त असाल तर थंड दूध प्या. त्यामध्ये साखर घालू नको. तुम्हाला आराम मिळेल.
रात्री झोपेच्या आधी गूळ खा, मासिक पाळीपासून ते लठ्ठपणापर्यंत अनेक समस्या होतील दूर
- अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर एक चमचा जिरं आणि अजवाईन तव्यावर हलकं भाजून घ्या. थंड झाल्यावर अर्धा चमचा साखरेसोबत याला खा. यानंतर 10 मिनिटांनी पाणी प्या.
- काळं मीठ वापरून आवळा खावा. तुम्ही अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी आवळा कँडीही खाऊ शकता.
- कोमट पाण्यामध्ये काळी मिरी आणि अर्ध लिंबू पिळून रोज सकाळी पाणी प्या.
- बडीशेप पोटात थंडपणा आणते. त्यामुळे ती चावून खाल्ली किंवा पाण्यासोबत खाल्ली तरी चालेल.
- लिंबू पाण्यात थोडी साखर टाकून प्यायल्यामुळे अॅसिडिटीपासून आराम मिळतो. (टीप : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही घरगुती उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)