22 जानेवारी या दिवसाची प्रतीक्षा देशभरातील असंख्य लोक करत आहेत. यादिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. राम मंदिर पाहण्यासाठी आणि रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. म्हणूनत अयोध्येत जाणाऱ्या भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर 23 जानेवारीला राम मंदिर दर्शनासाठी खुलं होणार आहे. पुण्याहून अयोध्येला कसं जायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे.
पुण्यापासून अयोध्येपर्यंतचा रस्ता 1568 किलोमीटर इतका आहे. त्यामुळे रस्त्याने जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 27 तास लागतील. कार, टॅक्सी किंवा खासगी बसने तुम्ही अयोध्येला पोहोचू शकता. खासगी बसने येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला प्रवासासाठी चार ते साडे चार हजार रुपयांचा खर्च येईल.
पुण्याहून अयोध्येला येण्यासाठी हवाई मार्गसुद्धा उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला जवळपास आठ ते दहा हजार रुपये खर्च येऊ शकतो. मुंबईहून अयोध्येला थेट विमानाने 2 तास 20 मिनिटं लागतात. मात्र पुण्याहून थेट विमान नसल्याने बेंगळुरू किंवा नवी दिल्लीला थांबून जावं लागतं. यासाठी किमान चार ते कमाल 16 तास लागू शकतात.
पुण्याहून अयोध्येला रेल्वेनं जाण्यासाठी येत्या 30 जानेवारीपासून 15 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. दर दोन दिवसांची एक ट्रेन पुण्याहून अयोध्येसाठी निघणार आहे. या प्रवासासाठी तुम्हाला 1 ते तीन हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो.