भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू एचएस प्रणॉय लवकरच आयुष्यभरासाठी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. BWF रँकिंगमधये प्रणॉय सध्या पहिल्या स्थानावर आहे.
एचएस प्रणॉय भारताच महत्त्वाच बॅडमिंटन खेळाडू आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने भारताच प्रतिनिधीत्व केलं आहे.
प्रणॉय पुढच्या आठवड्यात स्वेथा गोम्स सोबत विवाहबद्ध होणार आहे. दोघे बऱ्याचवर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
प्रणॉयच लग्न पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्याआधी त्याने प्री वेडिंग शूटचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
निरामया वेलनेस रिट्रीट येथे हे प्री वेडिंग शूट करण्यात आलं. प्रणॉय आणि तिच्या भावी वधूचा मनमोहक अंदाज दिसून आला.