Bar Liquor : जादा झाली दारु, काहीच हरकत नाही, तळीरामांना सुखरुप घरी पोहचवणार सरकार

Bar Liquor : दारु जास्त झाल्यास अनेकदा काही जणांना मित्रमंडळी अक्षरशः उचलून घरी सोडतात. पण या अशा तळीरामांना तिथलं सरकार सुखरुप घरी पोहचवणार आहे. तुम्ही म्हणाल, आता हे काय नवीन? पण या मागील कारण अत्यंत महत्वाचं आहे. का घेतला हा निर्णय...

Bar Liquor : जादा झाली दारु, काहीच हरकत नाही, तळीरामांना सुखरुप घरी पोहचवणार सरकार
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 4:16 PM

नवी दिल्ली | 08ऑगस्ट 2023 : दारु जास्त झाल्यास अनेकदा काही जणांना मित्रमंडळी अक्षरशः उचलून घरी सोडतात. पण या अशा तळीरामांना तिथलं सरकार सुखरुप घरी पोहचवणार आहे. तुम्ही म्हणाल, आता हे काय नवीन? पण या मागील कारण अत्यंत महत्वाचं आहे. का घेतला हा निर्णय (Alcohol Rule). जगभरात जास्त दारु पिण्याचे अनेक घटना घडतात. दारु पिऊन वाहन चालविल्यामुळे रस्ते अपघात वाढले आहेत. त्यात अनेकांचा नाहक जीव जातो. अशा घटनांना आळा घालण्यासाठी इटली या देशाने नवीन नियम तयार केला. इटलीमधील Bar मध्ये जर एखाद्याने जास्तीची दारु ढोसली आणि त्याचे स्वतःवरील नियंत्रण सूटले तर सरकार त्या तळीरामाला सुखरुप घरी पोहचवणार आहे. टॅक्सीतून त्या व्यक्तीला सुखरुप घरी पोहचविण्यात येईल. त्यासाठी त्याच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.इटली सरकार केवळ नियम करुन थांबली नाही तर प्रायोगित तत्वावर त्याची अंमलबजावणी सुरु झाली. गेल्या एक महिन्यापासून 6 नाईटक्लबमध्ये हा प्रयोग करण्यात येत आहे. रस्त्यावरील अपघाताची संख्या कमी करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. या योजनेत नाईटक्लबच्या बाहेर पडणाऱ्या तळीरामांची अल्कोहल चाचणी करण्यात येईल. ज्यांनी जास्त दारु पिली आहे. त्यांना तात्काळ फ्री टॅक्सी सर्व्हिसमार्फत घरपोच पोहचविण्यात येईल. या योजनेसाठी इटलीचा वाहतूक विभाग निधी देणार आहे. या योजनेला इटलीचे वाहतूक मंत्री, उप पंतप्रधान आणि हार्ड राईट लीग पार्टीचे नेते माटेओ साल्विनी हे प्रोत्साहन देत आहेत. इटलीत यापूर्वी अपघात रोखण्यासाठी दंड आणि कायदेशीर कारवाईचा प्रयोग झाला. पण अपघातांची मालिका खंडीत झाली नाही. त्यानंतर हा प्रयोग करण्यात येत आहे. युरोपातील आकेडवारीनुसार, इटलीमध्ये सर्वाधिक दारु विक्री होते. दारु पिऊन वाहन चालविण्याचे प्रमाण इतर युरोपियन देशांपेक्षा इटलीमध्ये अधिक आहे.

हे सुद्धा वाचा
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.