अंडा पालक आमलेट हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते. पालकामध्ये विविध विटामिन असतात आमलेटमध्ये जर तुम्ही पालक टाकत असाल तर तुमचे वजन कमी होऊ शकते. आणि हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी फॅट बर्नर सारख्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करतात. त्याने वजन देखील कमी होते मात्र, त्याचे दुष्यपरिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुमच्या नास्तामध्ये ओट्सचा समावेळ करा कारण वजन कमी करण्यास ओट्स मदत करते शिवाय पचण्यासाठी देखील ओट्स हलके असतात.
सकाळी उठून कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्या. यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते कोमट पाण्यात जेवढ्या शक्य आहे तेवढ्या लिंबाचा रस घाला कारण लिबांचा रस तुमचे वजन कमी करण्यास मदत करतो.
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी देखील अतिशय महत्वाची आहे दिवसातून शक्य आहे त्यावेळी ग्रीन टी घेतली पाहिजे त्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. ग्रीन टी पिल्यावर तुमचे तीन ते चार दिवसात वजन कमी झाल्यासारखे वाटेल
वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा देखील समावेश करा. हिरव्या भाज्यामुळे देखील तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करायचे आहे मात्र, दिवसभरात सारखी भूक लागेत मग अशावेळी आपण सफरचंद खाल्ले पाहिजे सफरचंदमुळे देखील वजन कमी होण्यास मदत होते.