झोपण्याआधी कोमट दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे रात्री चांगली झोप येते. गरम दुधामुळे शरीराला आरामही मिळतो. अभ्यासानुसार, कॅल्शियमयुक्त दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ स्नायूंना आराम देण्यास आणि तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.
नट्स आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. कारण यामध्ये जीवनसत्त्वे, झिंक आणि मॅग्नेशियम असतात. व्हिटॅमिन बी तणाव कमी करण्यास मदत करते, तर मॅग्नेशियम चांगले स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यास मदत करते. अभ्यासानुसार बदाम, पिस्ता आणि अक्रोड देखील रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
डार्क चाॅकलेट
अॅव्होकॅडोला एक सुपर फूड देखील म्हटले जाते, जे ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, फायटोकेमिकल्स, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. अव्होकाडोमध्ये पोटॅशियमही असते. हे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सी ताणतणाव कमी करण्यास उपयुक्त ठरते. संत्री, स्ट्रॉबेरी, द्राक्षे अशी फळे खाल्ल्यास तणाव कमी होण्यास मदत होते.