संत्री हे व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. या फळामध्ये थायमिन, फोलेट आणि पोटॅशियम देखील असतात. अर्ध्या संत्रीमध्ये 2.4 ग्रॅम फायबर असते.
नाशपती हे फळ आपला आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नाशपतीमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, व्हिटॅमिन के, कॉपर, मॅग्नेशियम असते. त्यात कमी प्रमाणात कॅलरी असतात. 1 मध्यम आकाराच्या नाशपतीमध्ये 5.5 ग्रॅम फायबर असते.
केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियमसह पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. केळी खाल्ल्याने वजन देखील कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे केळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. मध्यम आकाराच्या केळीमध्ये 1 ग्रॅम फायबर असते.
पेरू हा फायबरचा आणखी एक चांगला स्रोत आहे. प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि फायबर समृद्ध, पेरू चयापचय नियंत्रित करून आपले वजन नियंत्रित करण्यास मदत करते. 100 ग्रॅम पेरूमध्ये 5 ग्रॅम फायबर असते.
आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे. त्यात कॅलरी कमी असतात. आंबा व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी 6 समृद्ध आहे. आंबामध्ये बीटा कॅरोटीन देखील असतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. मध्यम आकाराच्या पिकलेल्या आंब्यात 5.4 ग्रॅम फायबर असते.