टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा T20 सामना गुवाहाटीमध्ये होणार आहे. टीम इंडियाकडे पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला हरवून मायदेशात T20 सीरीज जिंकण्याची संधी असेल. सूर्यकुमार यादव यामध्ये मोठा रोल निभावू शकतो.
सूर्यकुमार यादव आज फक्त दक्षिण आफ्रिकेलाच तोडणार नाही, तर रेकॉर्डशीही नात जोडणार आहे. बावुमा अँड कंपनीविरोधात दुसऱ्या टी 20 मध्ये सूर्यकुमार यादव मिशन 24 वर असणार आहे.
सूर्यकुमारच्या पोस्टची कोहलीने घेतली मजा, बीसीसीआय म्हणतं आम्ही विराटच्या बाजूने
सूर्यकुमार यादव आज 31 व्या इनिंगमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठू शकतो. वेगवान 1000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा भारतीय असेल.
भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान 1000 धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. तो 27 इनिंगमध्ये 1हजार धावांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर केएल राहुलने 29 इनिंगमध्ये हजार धावांचा टप्पा गाठला आहे.