चीनवर भारत ठरला वरचढ, विदेशातून आली भविष्यवाणी, ड्रॅगनची परिस्थिती होणार खराब
भारत आणि चीन यांच्यात स्पर्धा नेहमीच असते. दोन्ही देशांचे लष्करी सामर्थ्यापासून गुंतवणुकीपर्यंत स्पर्धा होत आहे. आता भारतासाठी चांगली बातमी आली आहे. या बातमीने चीनला धक्का बसला आहे. मूडीज एनालिटिक्सने भारताचा विकास दरात मोठी वाढ दर्शवली आहे.
India-China
Follow us
2024 मध्ये भारताचा विकास दर 7.1 % होणार आहे. यापूर्वी भारताच्या विकास दराचा अंदाज 6.8% होता. तसेच 2025 मध्ये भारतची अर्थव्यवस्था 6.5% टक्के वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
भारताचा वाढीचा दर जोरदार राहणार आहे. 2026 मध्ये भारताचा विकास दर 6.6% टक्के राहणार आहे. परंतु दुसरीकडे चीनचा विकास दर घसरणार आहे. चीनचा विकास दर 4.9% वरुन 4.7% वर आला आहे.
India-China
जून महिन्यात मूडीजचा अहवाल आला होता. त्यात 2026 मध्ये भारताचा विकास दर कमी असण्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे. आधी हा विकास दर 6.2% टक्के दाखवला होता. आता मात्र तो 7.8% टक्के दाखवला आहे.
जगातील अनेक कंपन्यांनी आपला मोर्चा चीन ऐवजी भारताकडे वळवला आहे. अॅपल आपली चीनमधील गुंतवणूक काढून आता भारताकडे वळवत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत आहे.