ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. एकीकडे दुखापतीचं ग्रहण, तर दुसरीकडे प्लेईंग इलेव्हनचं टेन्शन, अशा परिस्थितीत भारतीय संघ सिडनी कसोटीला सामोरं जात आहे.
याअगोदर दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताचे तीन खेळाडू जायबंदी झाले आहेत. दुखापतीमुळे आधीच के एल राहुल बाहेर पडला आहे. सिडनी टेस्टच्या अगोदर काही दिवस राहुलला प्रॅक्टिस करताना दुखापत होऊन तो सिरीजबाहेर गेला आहे. भारतीय संघाला राहुलच्या जाण्याने मोठा धक्का बसला.
मेलबर्न कसोटीदरम्यान भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादव याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे उमेश यादव (Umesh Yadav) तिसर्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवला आता रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे. त्यामुळे तो भारताकडे रवाना झाला आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) अॅडलेड कसोटीत दुखापतग्रस्त होऊन सिरीजमधून बाहेर पडला आहे. पॅट कमिन्सचा बॉल लागल्याने त्याला मोठी दुखापत झालीय. याच कारणास्तव त्याला मायदेशी परतावं लागलं आहे.