जोहान्सबर्गच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भलेही भारतीय संघ जिंकला नसेल, पण या सामन्यात शार्दुल ठाकूरने आपल्या कामगिरीने सर्वांची मन जिंकून घेतली.
सेंच्युरियन जिंकल्यानंतर जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी उलटवली व कसोटी जिंकली. सध्या मालिकेत 1-1 असे दोन्ही संघ बरोबरीत आहेत.
जोहान्सबर्ग कसोटीत शार्दुलने चेंडू आणि बॅटने कमाल दाखवत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला व आपल्या टीकाकारांची तोंड बंद केली.
भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने शार्दुलला संघात स्थान देण्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. फलंदाजी करु शकतो, म्हणून शार्दुल संघात आहे, असं त्याने म्हटलं होतं.
उपयुक्त फलंदाजी करता आली नसती, तर शार्दुल संघात चौथा गोलंदाज म्हणून स्वत:च स्थान निर्माण करु शकला नसता, असे आकाश चोप्राने म्हटलं होतं.
जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात शार्दुलने भन्नाट गोलंदाजीच प्रदर्शन केलं व सात विकेट घेतल्या.
आकाश चोप्राने शार्दुलला संघात स्थान देण्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. कारण शार्दुल धावा करत नाही, विकेट घेत नाही, मग तो संघात ? असा आकाश चोप्राचा प्रश्न होता.
शार्दुलने शानदार स्पेल टाकून कसोटीची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. सात विकेट घेणं, ही मोठी कामगिरी आहे. त्याने 28 धावा केल्या. त्यामुळे भारताने 240 धावांचे लक्ष्य दिले, असे आकाश चोप्राने सांगितले.
माझ्यामते लॉर्ड ठाकूर अभूतपूर्व आहे. शार्दुलने याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे आकाश चोप्राने म्हटले आहे.
तिसऱ्या केपटाऊन कसोटीत आता शार्दुल ठाकूरकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.