Marathi News Photo gallery India won against west indies in 2nd odi at narendra modi stadium captain rohit sharmas strategy works
Rohit Sharma: हिटमॅनने रचलेल्या सापळ्यात वेस्ट इंडिजचा गेम, जाणून घ्या रोहितची ‘ती’ जबरदस्त रणनिती
वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा (Rohit sharma) भले बॅटने कमाल दाखवू शकला नसेल, पण त्याने आपल्या रणनितीने प्रतिस्पर्धी संघाला चांगलच जेरीस आणलं.
1 / 10
वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा (Rohit sharma) भले बॅटने कमाल दाखवू शकला नसेल, पण त्याने आपल्या रणनितीने प्रतिस्पर्धी संघाला चांगलच जेरीस आणलं.
2 / 10
भारताने 50 षटकात फक्त 237 धावाच केल्या होत्या. वनडे क्रिकेटमध्ये हे फार मोठं लक्ष्य नाहीय. पण रोहितच्या जबरदस्त रणनितीमुळेच वेस्ट इंडिजची टीम या लक्ष्याच्या जवळपासही पोहोचू शकली नाही व भारताने 44 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
3 / 10
शाई होप आणि ब्रँडन किंग या वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली होती.
4 / 10
पण आठव्या षटकात रोहितने प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजीला आणलं. त्याने आधी ब्रँडन किंगची विकेट काढली. त्यानंतर डॅरेन ब्राव्होला तंबूचा रस्ता दाखवला.
5 / 10
रोहित शर्माने वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनची विकेट काढण्यासाठी सुद्धा एक वेगळी रणनिती अवलंबली.
6 / 10
रोहितने पूरनला बाद करण्यासाठी 20 व्या षटकात स्लीप लावली. स्वत: स्लीपमध्ये फिल्डिंगसाठी उभा राहिला व प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजीसाठी आणलं.
7 / 10
रोहितची ही रणनिती यशस्वी ठरली. निकोलस पूरनने कृष्णाच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये रोहित शर्माकडे सोपा झेल दिला. पूरनचा विकेट मिळाल्यानंतर रोहितने प्रसिद्ध कृष्णाला हटवून शार्दुल ठाकूरला गोलंदाजीसाठी आणलं.
8 / 10
रोहितची ही चाल समालोचकांनाही आश्चर्याचा धक्का देऊन गेली पण ही चाल यशस्वी ठरली. शार्दुलने जेसन होल्डरचा महत्त्वाचा विकेट मिळवून दिला.
9 / 10
वेस्ट इंडिजचा शॅमराह ब्रूक्स खेळपट्टीवर सेट झाला होता. त्याच्या 44 धावा झाल्या होत्या. त्यावेळी रोहितने 31 व्या षटकात दीपक हुड्डाला गोलंदाजीला आणलं. त्याने ब्रूक्सचा महत्त्वाच विकेट मिळवला.
10 / 10
रोहितने गोलंदाजीमध्ये सातत्याने केलेले सर्व बदल यशस्वी ठरले व 238 चे छोटे लक्ष्य असूनही वेस्ट इंडिजचा डाव 193 धावांवर आटोपला.