आयपीएल सुरू असताना रोहित शर्मा केकेआरमधील खेळाडू आणि स्टाफसोबत बोलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने रेकॉर्ड करण्यावरून स्टार स्पोर्ट्स कंपनीबाबत नाराजी व्यक्त केलेली.
रोहित शर्मा याच्या बाजूने मुकेश कुमार बोलला आहे. रोहित चुकीचा असू शकत नाही असं मुकेशने म्हटलं आहे. कारण तो जे काही बोलला ते अगदी योग्य आहे.
रोहित भाऊ जे काही बोलला ते अगदी बरोबर आहे. प्रत्येकाचं पर्सनल आयुष्य असून तुम्ही दर्शक वाढवण्यासाठी असं करू नका. जर रोहित कोणासोबत काही पर्सनल बोलत असेल तर तुम्ही ते रेकॉर्ड नाही केलं पाहिजे, असं मुकेश कुमारने म्हटलं आहे.
प्रत्येकजण रोहितसोबत आहे, कारण तो कधी चुकीचा असू शकत नाही. मी त्याला चांगला ओळखतो, तो एकदम योग्य बोलला आहे. मीडियाच्या लोकांना माझी विनंती आहे असं काही करू नका, असंही मुकेश कमार म्हणाला.
रोहित शर्मा आणि केकेआरचा कोच असलेल्या अभिषेक नायर यांच्यात बोलणं सुरू होतं. प्रत्येक गोष्ट बदलत आहे, काहीही असलं तरी ते माझं घर आहे. ती टीम मी बनवली आहे. माझे काय हे शेवटचे आहे, असं रोहित बोलत होता.