सिराजचं गाड्यांवर विशेष प्रेम आहे. काही वर्षांपूर्वी सिराज प्लाटिना चालवायचा. तेव्हा त्याच्याकडे पंक्चर काढण्यासाठीही पैसे नसायचे. अशा खडतर परिस्थितीवर सिराजने मात केली. त्याचे वडिल मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते. आपल्या मुलाने देशाचं प्रतिनिधित्व करावं, असं त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी अपार कष्ट केले.