PHOTO | भारतातील सर्वात पॉश एरियाचं नाव लुटियन्स झोन का पडलं? वाचा कारण…
दिल्लीला जाताना तुम्ही बऱ्याचदा लुटियन्स झोनचं नाव ऐकलंच असेल. (Interesting facts about Lutyens zone).
Follow us
दिल्लीला जाताना तुम्ही बऱ्याचदा लुटियन्स झोनचं (Lutyens zone) नाव ऐकलंच असेल. विशेष म्हणजे लुटियन्स झोन फक्त राजधानी दिल्लीतच नाही तर देशभरातील सर्वात पॉश विभागांपैकी एक आहे. या भागात दिग्गज राजकीय नेत्यांपासून मोठमोठ्या ख्यातनाम उद्योगपतींचे घरे आहेत. या परिसराला लुटियन्स झोन असं नाव का पडलं असेल? याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
लुटियन्स झोन (Lutyens zone) परिसराचं नाव ब्रिटिश आर्किटेक्ट सर अॅडविन लुटियन्स यांच्या नावाने ठेवलं गेलं आहे. ब्रिटिश काळात त्यांनीच या परिसराचा प्लॅन आखला होता.
सर अॅडविन लुटियन्स यांनी राष्ट्रपती भवन परिसरात चार बंगले डिझाईन केले होते. हे बंगले मदर टेरेसा क्रिसेंट रोड परिसरात आहेत.
सर अॅडविन लुटियन्स यांनी 1920 ते 1940 दरम्यान ज्या वास्तूंचं बांधकाम केलं ते प्रचंड आकर्षक होते. हे वास्तू अजूनही अबाधित आहेत.
लुटीयन्स प्लॅनमध्ये राजधानी दिल्लीचे हेरिटेड बिल्डिंग्स आणि सरकारी इमारतीदेखील आहेत.
ब्रिटिशांनी 1911 ते 1931 दरम्यान संसद भवन, उत्तर आणि दक्षिण ब्लॉक्स बांधले. यामध्ये अर्थ, गृह, संरक्षण आणि मिया मंत्रालयाच्या कार्यालयांचा समावेश आहे.