दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. लखनौने तीन पैकी दोन सामने जिंकलेत. गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स जिंकणारा सामना हरली, त्यानंतर कॅप्टन ऋषभ पंत निराश झाला होता. पण आता त्याच्या टीमसाठी चांगले दिवस आलेत.
डेविड वॉर्नर आणि एनरिच नॉर्खिया हे दोन खेळाडू सिलेक्शनसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सचे असिस्टंट कोच शेन वॉटसन यांनी दिली. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दोघे मैदानात उतरु शकतात.
एनरिच नॉर्खिया दुखापतीमुळे पहिले दोन सामने खेळला नव्हता. डेविड वॉर्नर पाकिस्तान दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाला परतला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार तो 6 एप्रिलनंतर आयपीएल खेळू शकतो. त्यामुळे वॉर्नर आता निवडीसाठी उपलब्ध आहे.
एनरिच नॉर्खिया आणि डेविड वॉर्नरमुळे दिल्लीची ताकत वाढणार आहे. वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू आहे. टिम सायफर्टच्या जागी तो पृथ्वी शॉ सोबत वॉर्नर सलामीला येऊ शकतो. एनरिक नॉर्खिया सुद्धा खेळणार, पण कोणाच्या जागी? हा प्रश्न आहे.
लखनौ सुपर जायंट्समध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. कॅप्टन केएल राहुल स्वत: मॅचविनर आहे. डि कॉक, इविन लुईसमुळे संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. दीपक हुड्डा आणि आयुष बदोनी सुद्धा कमालीचं प्रदर्शन करतोय.