भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भलेही इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु या मॅचमध्ये इंग्लंडच्या मोईन अलीने बहारदार बोलिंग केली. दुसऱ्या मॅचमध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या आणि तडकाफडकी 43 रन्स केले. याचंच बक्षीस त्याला मिळालं आहे. आयपीएल 2021 च्या बोलीमध्ये 3.5 अधिक पटीने तो विकला गेला आहे.