ईशा, आकाश, अनंत… मुकेश अंबानी यांच्या तीन मुलांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कोणाचा किती पगार

| Updated on: Feb 21, 2025 | 4:23 PM

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांचे उत्पन्न 86.8 अब्ज डॉलर आहे. मुकेश अंबानी यांच्याप्रमाणे त्यांचे तिन्ही मुले श्रीमंतीत कमी नाही. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यापैकी कोणाकडे जास्त पैसा आहे...

1 / 5
ईशा अंबानी आकाश अंबानी यांची जुळवी बहीण आहे. त्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बोर्डात नॉन-एग्जीक्यूटिव्ह डायरेक्टर आहे. रिलायन्स रिटेल, रिलायन्स जिओ आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या एग्जीक्यूटिव्ह लीडरशिप टीमच्या प्रमुख सदस्य आहे. तसेच ईशा टीरा ब्यूटी च्या एग्जीक्यूटिव्ह डायरेक्टर आणि को-फाउंडर आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 4.2 कोटी रुपये आहे. त्यांची संपत्ती 800 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.

2 / 5
आकाश मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. आकाश अंबानी हा ईशा अंबानी यांचा जुळा भाऊ आहे. आकाश अंबानी हे रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. ते रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक मंडळावरही आहेत.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाशचा वार्षिक पगार जवळपास 5.6 कोटी रुपये आहे. त्यांची एकूण संपत्ती 40.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 3,32,815 कोटी रुपये) असल्याचे सांगितले जाते.

3 / 5
अनंत अंबानी हे मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र आहेत. ते रिलायन्स जिओमध्ये ऊर्जा आणि दूरसंचार क्षेत्रांवर देखरेख करतात. ते Jio Platforms Limited आणि Reliance Retail Ventures Limited च्या बोर्डवर संचालक म्हणूनही काम करतात. अनंत यांना वार्षिक 4.2 कोटी पगार मिळतो. त्यांची एकूण संपत्ती 40 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 3,32,482 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

4 / 5
मुकेश अंबानींच्या तीन मुलांमध्ये आकाश अंबानी सर्वात श्रीमंत आहे. अनंत अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ईशाचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी वेळोवेळी आपल्या मुलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत असतात.

5 / 5
मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात संपत्तीवरुन वाद झाले होते. ते वाद आता पुन्हा होवू नये म्हणून मुकेश अंबानी यांनी कंपनीतील जबाबदारी आपल्या तीन मुलांवर सोपवली आहे.