Marathi News Photo gallery Kamika Ekadashi Pandharpur A crowd of 50,000 devotees in a single day for Vitthal Rukmini mandir darshan Maharashtra
Kamika Ekadashi 2021 : आषाढीला बंदी, कामिका एकादशीला धमाका, पंढरपुरात एकाच दिवसात 50 हजार भाविकांची गर्दी
एकीकडे भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली असली, तरी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर कोरोना निर्बंधामुळे बंद आहे. त्यामुळे भाविक चंद्रभागेचे स्नान करून, संत नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत.
त्याची दखल घेत प्रशासनाच्यावतीने मंदिर परिसरात, तसेच प्रदक्षिणा मार्गावर पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांची कोरोना टेस्ट केली जात आहे. पोलीस विभागाच्या वतीने भाविकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या वेळोवेळी सूचना सुद्धा दिल्या जात आहेत.
Follow us
पंढरपूर : कोरोना निर्बंधामुळे एकीकडे आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना पंढरपुरात जाता आलं नाही. मात्र आता कामिका एकादशीनिमित्ताने पंढरपुरात गर्दीचा स्फोट झाल्याचं दिसतंय.
कामिका एकादशीसाठी पंढरपुरात थोडेथोडके नव्हे तर 50 हजार भाविक दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीचे दर्शन चुकल्यामुळे भाविकांनी आता कामिका एकादशीला पंढरपुरात गर्दी केली.
आज कामिका एकादशी आहे. वारकरी संप्रदायामध्ये कामिका एकादशीला वेगळे महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या काळामध्ये पंढरपुरा संचारबंदी होती. अनेक भाविकांना इच्छा असूनही पंढरपूरमध्ये येता आलेलं नव्हतं.
आज कामिका एकादशीनिमित्ताने राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. दरम्यान, एकीकडे भाविकांनी गर्दी केली असली, तरी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर कोरोना निर्बंधामुळे बंद आहे. त्यामुळे भाविक चंद्रभागेचे स्नान करून, संत नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत.
मंदिर परिसरातील प्रसाद विक्रीची दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत. दरम्यान भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी येणाऱ्या भाविकांची कोरोना टेस्ट करण्याची मागणी केली होती
त्याची दखल घेत प्रशासनाच्यावतीने मंदिर परिसरात, तसेच प्रदक्षिणा मार्गावर पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांची कोरोना टेस्ट केली जात आहे. पोलीस विभागाच्या वतीने भाविकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या वेळोवेळी सूचना सुद्धा दिल्या जात आहेत.