
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे सध्या आलिया भट्ट, रणवीर सिंह आणि करण जोहर हे चर्चेत आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या गाण्याची शूटिंगही कश्मीरमध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे डिलीवरीनंतर पहिल्यांदाच तुम क्या मिले जाण्याचे शूटिंग आलिया हिने केले.

आलिया भट्ट हिने एक व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये करण जोहर हा आलिया भट्ट हिची माफी मागताना दिसत आहे. कारण या गाण्याचे शूटिंग बर्फामध्ये करण्यात आले आणि आलिया हिने फक्त शिफॉन साडी घातली होती.

ज्याठिकाणी गाण्याचे शूटिंग करण्यात आले तिथे खूप जास्त थंडी होती आणि आलिया शिफॉन साडीत होती. करण जोहर याने देखील जॅकेट घातले होते. यामुळे करण जोहर हा आलियाची माफी मागताना दिसतो.

करण हा आलियाला म्हणतो मला माफ कर पण जॅकेटमध्ये रोमान्स केला जाऊ शकत नव्हता ना. करण जोहर याला रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत.