
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता किआरा नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

फोटोमध्ये किआरा समुद्र किनारी फोटोशूट करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा आहे. किआराचे फोटो पाहिल्यानंतर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

लग्नानंतर किआरा अधिक ग्लॅमरस दिसत असल्याची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगत आहे. किआराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी देखील चाहत्यांचं लक्ष वेधलं.

किआरा आणि सिद्धार्थ गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण लग्नाआधी कधीही दोघांनी त्याचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही. पण मोठ्या थाटात लग्न झाल्यानंतर अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसले.

किआरा आणि सिद्धार्थ यांच्या नात्याच्या चर्चांनी 'शेरशाह' सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अधिक जोर धरला. सिनेमातील दोघांती केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. सध्या सर्वत्र किआराच्या नव्या फोटोंची चर्चा आहे.