Paru | हो, विश्वास नाही बसणार, पण खऱ्या आयुष्यात अहिल्यादेवी किर्लोस्कर इतक्या सुंदर, ग्लॅमरस Photos
Paru | सध्या 'पारू' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अहिल्यादेवी किर्लोस्कर या पात्राने प्रेक्षकांवर जादू केलीय. सीरीयलमध्ये हे पात्र जितक कठोर, करारी वाटतं. खऱ्या आयुष्यात मात्र या पात्राची एक वेगळी बाजू आहे.
Mugdha KarnikImage Credit source: instagram
Follow us
सध्या टीव्हीवर ‘पारू’ ही मालिका गाजत आहे. या मालिकेतील पारू म्हणजे शरयू सोनवणे, प्रसाद जवादे हे नायक-नायिकेच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलच आहेच. पण अजून एक पात्र प्रेक्षकांच्या मनावर कोरल गेलय, ते म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्कर.
अहिल्यादेवी किर्लोस्करांच पात्र रंगवलय ते मुग्धा कर्णिक यांनी. करारी नजर, कठोर स्वभाव हे अहिल्यादेवींच वैशिष्ट्य. पारु आणि अहिल्यादेवी यांच्यातल्या नात्यावर मालिकेच कथानक फुलत जाणार आहे. मुग्धा कर्णिक अहिल्यादेवीच्या पात्रातून प्रेक्षकांवर छाप उमटवण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
अहिल्यादेवी किर्लोस्करांच पात्र मालिकेत जरी कठोर वाटत असलं, तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र, सर्वांशी जुळवून घेण्याचा, मिळून-मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर मारली, तर त्यांच्या स्वभावाची झलक दिसून येते. त्यामुळे पडद्यावर त्या खूप शिस्तबद्ध वाटत असल्या तरी प्रत्यक्षात तसं नाहीय.
मुग्धा कर्णिक यांनी पारु मालिकेत काम करण्याआधी झिम्मा, स्वाभिमान, होम स्वीट होम या मालिका, नाटक तसेच चित्रपटातून अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. आता अहिल्यादेवींच्या भूमिकेतून त्यांनी विशेष छाप उमटवली आहे.
मुग्धा कर्णिक यांनी याआधी अहिल्यादेवी किर्लोस्करांसारखी भूमिका साकारलेली नाही. नेहमी सत्य जे आहे, त्याला साथ देणारी ही व्यक्तीरेखा आहे. समोरच्याबद्दल आपलुकी वाटते, पण ती व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाला अहिल्यादेवींबद्दल भितीयुक्त आदर आहे.