rolls royce | रोल्स रॉईसच्या या छत्रीची किंमत 700 डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार साधारण 52 हजार इतकी आहे. तुमच्याकडे इतके पैसे असतील तर तुम्ही या छत्रीसाठी ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता.
रोल्स रॉयसची ही छत्री अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Follow us
अलिशान आणि महागड्या गाड्यांसाठी जगभरात रोल्स रॉयस (rolls royce) हा ब्रँड प्रसिद्ध आहे. उच्चभ्रू वर्तुळात रोल्स रॉयस हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.
याच रोल्स रॉयस (rolls royce) कंपनीच्या छत्र्याही चर्चेचा विषय असतो. रोल्स रॉयस कारप्रमाणे या छत्रीची किंमतही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
या छत्र्यांची बनावट ही विशिष्ट पद्धतीने करण्यात येते. रोल्स रॉयसच्या छत्रीची मूठ (हँडल) ही अत्यंत आकर्षक असते. विशिष्ट धातुपासून तयार करण्यात आलेल्या या हँडलवर रोल्स रॉयसचा लोगो असतो.
रोल्स रॉयसच्या या छत्रीची किंमत 700 डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार साधारण 52 हजार इतकी आहे. तुमच्याकडे इतके पैसे असतील तर तुम्ही या छत्रीसाठी ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता.
या छत्रीसाठी रोल्स रॉयस गाड्यांमध्येही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कारच्या दरवाजात ही छत्री ठेवली जाते. बटण दाबल्यानंतर छत्री बाहेर येते.