निवडणूकीच्या काळात नेत्यांची रीघ, 4 मंदिरात गेल्याने राजकारणात यश हमखास मिळते
देशात अशी अनेक सिद्ध मंदिरे आहेत, जिथे दर्शन आणि पूजा केल्याने जीवनाशी संबंधित मनोकामना तर पूर्ण होतात. त्याच प्रमाणे भारताता अनेक मान्यता आहेत त्यांपैकी एक म्हणजे काही मंदिरात गेल्यावर निवडणूकीत यश हमखास मिळते. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती मंदिरे.
1 / 5
हिंदू परंपरेत मंदिर म्हणजे असे ठिकाण जिथे जीवनाशी संबंधित सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. देशात देवी-देवतांशी संबंधित अशी अनेक चमत्कारिक मंदिरे आहेत. अशी मान्यता आहे त्यामुळेच निवडणुकीचा हंगाम येताच या पवित्र ठिकाणी राजकारण्यांची गर्दी होऊ लागते. आज देशातील अशाच काही सिद्ध मंदिरांबद्दल जाणून घेऊया, जिथे मोठे राजकारणी अनेकदा विजयासाठी आपली उपस्थिती लावतात.
2 / 5
मध्य प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील दतिया नावाच्या ठिकाणी माता पीतांबराचे पवित्र मंदिर आहे, जेथे भेट देणारा मंत्रीची ईच्छा माता निश्चितपणे पूर्ण करते. असे मानले जाते की या मंदिरात मातेची पूजा केल्याने निवडणुकीत विजय मिळतो. त्यामुळेच निवडणुका आल्या की या मातेच्या पवित्र पीठावर मोठे राजकारणी भेट देतात.
3 / 5
५१ शक्तिपीठांपैकी मुख्य शक्तिपीठ म्हणजे कामाख्या मातेच्या पवित्र मंदिर. असे मानले जाते की जी साधना कुठेही यशस्वी होत नाही, ती साधना या मंदिरात नक्की साध्या होते. काळ्या जादूच्या कर्मासाठी कामाख्या शक्तीपीठ हे महत्त्वचे ठिकाण मानले जाते. कामाख्याच्या पवित्र निवासस्थानातून कोणीही रिकाम्या हाताने जात नाही. चमत्कारांनी भरलेल्या या मंदिरात देशातील अनेक बड्या नेत्यांनी विजयासाठी पूजा केल्या आहेत.
4 / 5
कामाख्याप्रमाणेच, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात असलेल्या विंध्यवासिनी मातेच्या मंदिरात मोठ्या संख्येने राजकारणी त्यांच्या इच्छेसाठी प्रार्थना करण्यासाठी पोहोचतात. हे शक्तीपीठ विशेषतः निवडणुकीच्याल काळात महत्त्वाचे मानले जाते. मां विंध्यवासिनी हे असेच एक जागृत शक्तीपीठ आहे, जिथे तंत्र-मंत्राशी संबंधित आध्यात्मिक येथे होताता. त्यामुळेच निवडणुका जिंकण्याची स्वप्ने पाहणारे बडे राजकारणी अनेकदा पूजा-अर्चा करण्यासाठी येथे पोहोचतात.
5 / 5
दक्षिणमुखी शिवमंदिर असलेल्या उज्जैन महाकाल मंदिर हे श्रद्धेचे मोठे मंदिर आहे. सत्ता मिळवण्यासाठी देशातील अनेक पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी तीर्थक्षेत्र उज्जैनच्या महाकाल मंदिरात पूजा केली आहे. तंत्र-मंत्राच्या अभ्यासासाठी महाकाल नगरी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळेच निवडणुका आल्या की विजयाचे सोपस्कार पार पाडण्यासाठी मोठे राजकारणी येथे पोहोचू लागतात. त्याचबरोबर काही नेते गुपचूप विधी करून घेतात. पण या ठिकाणी कोणताच नेता वास्तव्य करु शकत नाही. तसे झाल्यास त्याची सत्ता जाते अशी अनेक उदाहरणे आहेत.