यमुनोत्री चारधाम यात्रेचा पहिला टप्पा मानला जातो.19व्या शतकात जयपूरच्या राणी गुलेनियाने यमुनोत्री बांधला होता अशी मान्यता आहे. येथे गरम पाण्याची अनेक कुंडे आहेत. हे मंदिर दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या वेळी उघडले जाते. दिवाळीला येथे विशेष पूजा केली जाते.
सर्व पर्यटकांचे आवडीचे स्थान म्हणजे केदारनाथ. पुराणामध्ये येथे स्कंद सापडला होता अशी नोंद मिळते. जर तुम्हाला उत्तराखंड मधील केदारनाथ येथे .जाण्याचा विचार करणार असाल तर एप्रिल ते नोव्हेंबर हा काळ उत्तम मानला जातो. थंडीच्या दिवसात येथे बर्फ पडतो आणि त्यामुळे मंदिर बंद होते.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार,राजा भगीरथच्या कठोर तपश्चर्येनंतर गंगा नदी पृथ्वीवर आली आणि तिचे नाव गंगोत्रीमध्ये भागीरथी ठेवण्यात आले. या स्थानास गंगा नदीचा उगम स्थान मानले जाते. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला मंदिर उघडले जाते आणि दिवाळीनंतर दर्शनासाठी बंद केले जाते.
8व्या शतकात बद्रीनाथ नावाच्या आदि शंकराचार्यांनी बद्रीनाथला तीर्थक्षेत्र म्हणून स्थापित केले. सध्या हे मंदिर उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे. या मंदिरात भगवान विष्णू सहा महिने झोपतात अशी मान्यता आहे.