बॉलिवूड अभिनेते जॉकी श्रॉफ यांची मुलगी आणि अभिनेता टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते (Krishna Shroff first post after breakup).
काही दिवसांपूर्वी कृष्णाचं बॉयफ्रेंड एबन हायम्स सोबत ब्रेकअप झाला. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लोकांना एबन हायम्ससोबत नाव न जोडण्याची विनंती केली.
Follow us
बॉलिवूड अभिनेते जॉकी श्रॉफ यांची मुलगी आणि अभिनेता टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
काही दिवसांपूर्वी कृष्णाचं बॉयफ्रेंड एबन हायम्स सोबत ब्रेकअप झाला. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लोकांना एबन हायम्ससोबत नाव न जोडण्याची विनंती केली.
‘सगळे चाहते खूप चांगले आहात. पण मला आता एबन हायम्ससोबत टॅग करु नका. कारण आता आम्ही एकत्र राहत नाहीत. त्यामुळे आमचं नाव एकत्र जोडू नका. तसंही ते सर्वश्रृत होतं. धन्यवाद…’, असं कृष्णा आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर म्हणाली होती.
कृष्णाने शनिवारी (21 नोव्हेंबर) इन्स्टाग्रामवर पहिल्यांदा फोटो शेअर केला. या फोटोत ती सेल्फी काढताना दिसत आहे. “आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, कमबॅक करावं लागतं”, असं कृष्णा फोटोसोबत म्हणाली आहे. त्याचबरोबर तिने ‘कमबॅक सीजन’ असा हॅशटॅग दिला आहे
दरम्यान, कृष्णाने इन्स्टाग्रामवरील एबन हायम्स सोबत असलेले सर्व फोटो डिलिटे केले आहेत.
कृष्णा आपल्या फिटनेसकडे नेहमी लक्ष देत असते. ती सोशल मीडिावर जीममध्ये वर्क आऊट करण्याचे व्हिडीओदेखील शेअर करते.
दिवाळीत तिने आपल्या आई आणि भाऊ टायगर श्रॉफसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.