‘लापता लेडीज’ फेम अभिनेत्रीला सेटवर दिग्दर्शकाकडून शिवीगाळ; आईच्या डोळ्यांत आलं पाणी!

नितांशी ही केवळ 17 वर्षांची असून तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने बॉलिवूडच्या मोठमोठ्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. IMDb ने जाहीर केलेल्या सर्वांत लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत तिने बाजी मारली आहे. नितांशी या टॉप 25 सेलिब्रिटींच्या यादीत अग्रस्थानी आहे.

| Updated on: May 15, 2024 | 10:01 AM
अभिनेता आमिर खानची पूर्व पत्नी किरण रावने तब्बल 13 वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलंय. तिच्या 'लापता लेडीज' या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेषकरून चित्रपटात फूल कुमारीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नितांशी गोयलचा साधेपणा आणि सहज अभिनय अनेकांना खूप आवडला.

1 / 5
'लापता लेडीज' या चित्रपटामुळे नितांशीच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली आहे. मात्र हा तिचा पहिलाच चित्रपट नाही. याआधी तिने नऊ मालिकांमध्ये काम केलंय. तिचा इथपर्यंतचा प्रवास काही साधासरळ नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नितांशीने एक वाईट अनुभव सांगितला.

2 / 5
नितांशीने सांगितलं की एका दिग्दर्शकाने तिचा खूप अपमान केला होता. हे पाहून नितांशीची आई खूप रडली होती. "एका मालिकेच्या दिग्दर्शकाला मी पसंत नव्हती आणि त्यामागचं कारण माझं परफॉर्मन्स नव्हतं. मी रातोरात एका मुलीची जागा घेतली होती. ज्या मुलीच्या जागी मला घेतलं गेलं, तिच्याबद्दल मला काहीच माहित नव्हतं", असं तिने सांगितलं.

3 / 5
याविषयी ती पुढे म्हणाली, "जेव्हा मी सेटवर पोहोचली, तेव्हा मला खूप वेगळी वागणूक दिली गेली. दिग्दर्शक माझ्यावर अचानक ओरडू लागले होते. मी त्यांना म्हणाले की, जर तुम्ही मला शिकवलंत तर मी तसंच करेन. पण ते माझं ऐकण्यास तयार नव्हते आणि ते जोरजोरात ओरडू लागले."

4 / 5
"माझी आई त्यादिवशी सेटवरच बसली होती. दिग्दर्शकांची माझ्याप्रती वाईट वागणूक पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अत्यंत कमी वयात मी हे सर्व सहन केलं होतं", असं नितांशीने सांगितलं.

"माझी आई त्यादिवशी सेटवरच बसली होती. दिग्दर्शकांची माझ्याप्रती वाईट वागणूक पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अत्यंत कमी वयात मी हे सर्व सहन केलं होतं", असं नितांशीने सांगितलं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.